कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

करंजी | वार्ताहर

पाथर्डी तालुक्यातील भोसे गावचे शेतकरी आसाराम नानाभाऊ टेमकर (वय वर्षे ६०) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेतल्याने त्यांचा सोमवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत त्यांचा मुलगा बाळासाहेब टेमकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझे वडील असाराम टेमकर यांनी भोसे सेवा संस्था व करंजी येथील राष्ट्रीय बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाची त्यांना परतफेड करणे शक्य होत नव्हते. इतरही काही व्यक्तींकडून त्यांनी उसनवारीने पैसे घेतले होते. त्यांचाही तगादा वाढला होता.

या सर्व आर्थिक अडचणीमुळे त्यांनी शुक्रवारी ७ जानेवारीला शेतामध्ये विषारी औषध घेतले याची माहिती समजताच कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान १० जानेवारीला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भोसे येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केलेल्या आत्महत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.