सात हजार शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा

प्रादेशिक साखर सहसंचालकांचे श्रीगोंदा कारखान्याला आदेश
सात हजार शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याने सभासदत्व फी भरूनही वंचित ठेवलेल्या 7 हजार 326 शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा असे लेखी आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक (साखर) अ.नगर यांचे कार्यकारी संचालकांनी कारखाना व्यवस्थापनास दिले आहेत. शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे.

सात हजार शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा
15 ऑक्टोबर पूर्वी ऊस गाळप हंगाम सुरु केल्यास होणार गुन्हा दाखल

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याने एप्रिल 2021 मध्ये 7 हजार 326 शेतकर्‍यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी प्रत्येकी 10 हजार 100 घेतली होती. मात्र 16 महिने त्या सर्व शेतकर्‍यांना सभासद्व देण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते.

सात हजार शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा
शिक्षिकेवर शिक्षकाचा अत्याचार

श्रीगोंदा शिरूर तालुक्यातील शेतकरी भाऊसाहेब पवार, प्रशांत मगर, अभिषेक गिरमकर, सोमनाथ जाधव, रविंद्र मचाले, सिद्धेश्वर नांद्रे, सुनील जाधव, श्रीकांत मगर, महेश पवार, अनंत पवार व इतर शेतकरी यांनी या विरोधात गुरूवारी (दि.22) प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या अहमदनगर येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केले होते. तसेच त्यांनी साखर सहसंचालकांना निवेदन दिले. प्रादेशिक साखर सह संचालकांनी याची तात्काळ दखल घेत.

सात हजार शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा
मंत्रालयात दोन-तीन वेळा गेलेल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये

मानवी सभासदांचा सहकार कायदा नियम उपविधीनुसार कारखान्याने पात्र व्यक्तींची नावे आय व जे नोंदवहीत समाविष्ट करून सभासदांना सभासद क्रमांक व भाग दाखले पंधरा दिवसात देण्याचे लेखी आदेश दिले. हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकर्‍यांचा विजय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कारखाना प्रशासनाने तात्काळ करावी अशी मागणी उपोषणकर्ते भाऊसाहेब पवार यांनी केली.

सात हजार शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा
नेवासाफाटा येथील तीन हॉटेलांवर पोलिसांचे छापे

उपोषण स्थळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर, जिजाबापू शिंदे, संदीप नागवडे, जितेंद्र मगर, बाळासाहेब मगर, रफिक इनामदार, बाळासाहेब पवार, किरण कुरुमकर मदन मगर, खिवराज मचाले, आंकुश नवले व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सात हजार शेतकर्‍यांना पंधरा दिवसात सभासद करा
लोणी व्यंकनाथचे वादग्रस्त सरपंच अखेर अपात्र

साडेसात कोटींचे काय केले

दरम्यान उपोषणकर्त्या सर्व शेतकर्‍यांनी जमा झालेल्या भाग भांडवल व प्रवेश प्रवेश फी 7 कोटी 51 लाख रुपये गोळा झाले, त्याचे साधारणपणे 37 लाख रुपये व्याजाच्या रक्कमेचे कारखान्याने काय केली याचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com