..अन्यथा मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवू - सावंत

..अन्यथा मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवू - सावंत

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याबाबत योग्य ती कारवाई करावी अन्यथा 12 डिसेंबर रोजी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून आपली जीवनयात्रा संपवू, असा इशारा राज्याचे शेतकरी नेते दशरथराव सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे.

लातूरचे माजी आमदार माणिकराव जाधव यांनी राज्य सहकारी बँकेतील घोटाळा काढला असून त्यातून ज्या काही गोष्ट बाहेर जनतेसमोर आणल्या आहेत त्यात पवार काका पुतण्यांचा मोठा हात आहे. त्यांनी राज्यातील साखर कारखाने कवडीमोल किमतीने घेऊन त्या फाईल्स सिंचन घोटाळ्यासह बंद का केल्या? राज्यात इतकी उलथापालथ होऊनही तुमचे सरकार गप्प का आहे? असा सवालही सावंत यांनी केला.

राज्य बँक चौकशी प्रकरणी फेरचौकशीचा जो आदेश होऊन त्यावर राज्य सरकारने चौकशी करावी व त्यावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करावे तसे पत्र आपण व्यक्तिगत पत्र तुमच्या सहीने 12 डिसेंबर पर्यंत द्यावे अन्यथा 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हा दोघांचा निषेध करून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून माझी जीवनयात्रा संपविणार असल्याचे श्री सावंत यांनी फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com