file photo
file photo
सार्वमत

खंडकरी शेतकर्‍याने दिला आत्मदहनाचा इशारा

प्रशासनाकडून सातबारा उतार्‍यावर नोंद होत नसल्याने

Arvind Arkhade

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

प्रशासनाकडे आपल्या वहिवाटीच्या जमिनीची सातबारा उतार्‍यावर आमच्या नावाची नोंद करून मिळाव्यात अशी मागणी केली आहे तरी प्रशासनाकडून विलंब होत असल्याने खंडकरी शेतकरी नारायण राऊत यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील खंडकरी शेतकरी नारायण माधवराव राऊत हे मूळ खंडकरी भिकुबाई जाधव यांचे वारस असून शासन नियमाप्रमाणे त्यांना सन 2013 ते 2014 या कालावधीत शेती महामंडळाच्या ताब्यात असलेले क्षेत्रापैकी काही क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.

तरी खंडकरी शेतकरी नारायण माधवराव राऊत व इतर अशोक राऊत चंद्रकांत राऊत किशोर राऊत यांना अद्यापपर्यंत शासनाकडून सातबारा उतार्‍यावर 6 ते 7 वर्षापासुन नोंद झालेली नाही त्यामुळे नारायण राऊत यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे आपल्या वहिवाटीच्या जमिनीची सातबारा उतार्‍यावर आमच्या नावाची नोंद करून मिळाव्यात अशी मागणी केली आहे.

तरी प्रशासनाकडून विलंब होत असल्याने श्री नारायण राऊत यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर, उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, तहसीलदार श्रीरामपूर तसेच पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर यांना लेखी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरात लवकर आमची मागणी मान्य करून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी तरी श्री. राऊत यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com