शेतकर्‍यांनी ई पीक पाहणी नोंदणी करावी - तहसीलदार निकम

ई पीक पाहणी
ई पीक पाहणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना आपल्या शेताची पीक पाहणी मोबाईलवरून करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. तरी आतापर्यंत जे शेतकर्‍यांनी मोबाईलवरून आपल्या शेतातील पिकाची नोंदणी केली केली नसेल त्यांनी प्ले स्टोरवरून ई पीक पाहणी व्हर्जन -2 हे अ‍ॅप डाऊनलोड करून पीक पाहणी नोंदणी 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत करावी, असे आवाहन तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

आपण पीक पाहणी न नोंदविल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. पीक पाहणी नोंदणी करताना अडचण आल्यास मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याशी संपर्क करावा. तसेच मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल हे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित राहून ई-पीक पाहणीच्या कामकाजा संदर्भात शेतकरी बांधवांच्या मदतीकरिता उपस्थित राहणार आहेत. येणेप्रमाणे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी 7/12 पीक पाहणीची नोंदणी करावी, असे आवाहन श्री. निकम यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com