झोपेत असतांना पडली वीज; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

झोपेत असतांना पडली वीज; शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कळस (वार्ताहर)-

अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे काल सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने कैलास पुंजा डोके या शेतकऱ्याचा गाढ झोपेत असताना वीज पडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने मोठे दुःख या कुटुंबाला झाले असून सदरील घटना समजतात पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ, अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश गडाख, पंचायत समिती सदस्य गोरख पथवे, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दिपक पथवे, तालुका अध्यक्ष सुरेश पथवे, सचिव बाळासाहेब मधे, राजू सावंत, गुलाब तेलम, गोरख डोके, विलास अगीवले, भरत गिऱ्हे, काळू पथवे या सहित अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन डोके कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व डोके कुटुंबाला भावनिक आधार दिला. विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.