विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू

पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील घटना
विहिरीत पडून शेतकर्‍याचा मृत्यू

करंजी |वार्ताहर|Karanji

पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील नारायण भाऊसाहेब पाठक (वय 45) यांचा गुरुवार (दि.13) पाय घसरल्याने विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अतिशय कष्टाळू आणि गरीब कुटुंबातील या शेतकर्‍याचा विहिरीजवळ शेतातील काम करत असताना पाय घसरून विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे घाटशिरस परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पाठक यांच्या मृत्युनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून प्रशासकीय पातळीवर त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर यांनी केली आहे. पाठक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com