दुर्दैवी! मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

दुर्दैवी! मोटार चालू करताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

लोहगाव | वार्ताहर

राहता तालुक्यातील वाखारवाडी लोहगाव येथील भाऊसाहेब चांगदेव चेचरे ( वय ६० ) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

शनिवार (दि.९) सकाळी शेतावर मोटार सुरू करण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. बराच वेळ होऊनही का येत नाहीत, हे पाहण्यासाठी त्यांचा घरचे घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांचा मृतदेह मोटारीच्या खोक्याजवळ आढळुला आला.ही बातमी वाऱ्यासारखे गावात पसरली व सर्वत्र त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com