शेतकर्‍याचे घरफोडून ऐवज लंपास

खातगाव टाकळी येथील घटना
शेतकर्‍याचे घरफोडून ऐवज लंपास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चोरट्यांनी खातगाव टाकळी (ता. नगर) मध्ये धुमाकूळ घातला आहे. गावातील दोन मंदिराच्या दानपेट्या फोडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शेतकर्‍याचे घर फोडले.

खातगावी टाकळी शिवारातील बारभाई मळा येथे राहणारे बापू केशव गायकवाड (वय 65) यांचे घर चोरट्यांनी मंगळवारी (दि.9) रात्री नऊ ते बुधवारी (दि. 10) मध्यरात्री दीड वाजण्याचा सुमारास फोडले. 17 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, तीस हजार रूपये रोख रक्कम, एक घड्याळ असा सुमारे 48 हजार रूपये किंमतीचा ऐवजी चोरला.

चोरट्यांनी घरात घुसून ऐवज लुटल्याची माहिती मध्यरात्रीच गायकवाड यांच्या लक्षात आली. त्यांनी बुधवारी सायंकाळी एमआयडीसी पेालीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाहेर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com