आकारी पडीक शेतमालक संघर्ष कृती समितीची स्थापना
सार्वमत

आकारी पडीक शेतमालक संघर्ष कृती समितीची स्थापना

नऊ गावांमधील सदस्यांचा समावेश अ‍ॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शन

Arvind Arkhade

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

शेती महामंडळाच्या हरिगांव मळा हद्दीत परिसरातील 9 गावांतील आकारी पडीक शेतकर्‍यांनी जमिन परत मिळण्यासाठी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केल्यानंतर शेतकरी संघटनेचे राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत 9 आगष्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून आकारी पडीक शेतमालक संघर्ष कृती समिती ची स्थापना करण्यात आली.

शेतीमहामंडळ परिसरातील 9 गांवच्या आकारली पडीक जमिन मालकाच्या उपस्थितीत खोकर येथे संपन्न झालेल्या बैठकीत आकारी पडीक मुळ जमिनीत करारदार विहीरी, बोअर, शेततळे, रस्ते करत आहेत. यांना तीव्र विरोध करणे, यासाठी स्थापन केलेल्या आकारी पडीत शेतकरी संघर्ष कृती समितीमध्ये नऊ गावातील सदस्य आहेत.

त्यात गिरीधर आसने, बाळासाहेब दगडू आसने, शरद आसने, भाऊसाहेब बांद्रे, सुरेश ताके, दिलीप गलांडे, सोपान नाईक, पांडूरंग पवार, गोविंदराव वाघ, बाळासाहेब कासार, वसंतराव मुठे, भास्कर पाराजी शिंदे, शिवाजी रूपटक्के, शालनताई झुराळे, बाळासाहेब औताडे, डॉ. दादासाहेब आदिक, बाळासाहेब बकाल, बबनराव वेताळ यांचा समावेश आहे.

या समितीने आकारी पडीक वारसदार जमिनीत करारदार शेतकर्‍यांना पाय ठेऊन देऊ नये, ज्या हक्काचे जमिनीवर आकारीपडीक वारसदार सोडून बाहेरील करारदार व्यक्तींनी मशागत करण्यासाठी सुरूवात केली अशांना बाहेर काढणे.

जयदीप आसने व सहकार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेत पुरवणी कागदपत्रे अन्य वारसदार वकिलपत्र जोडून न्यायालयायीन लढा सुरू ठेवून वेळप्रसंगी कामकाजास उच्च न्यायालयात हजर राहणे. शेतकरी संघटनेतर्फे राज्य युवा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे संघटनेच्यावतीने विनाशुल्क केस लढवणार असल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले.

या बैठकीस सभापती दिपक पटारे, विष्णुपंत खंडागळे, सरपंच बाबासाहेब चिडे, सुरेश डांगे, नानासाहेब आसने,अनिल औताडे, संपतराव मुठे, शेषराव मुठे, तुकाराम मुठे, नानासाहेब बोर्डे, बबनराव नाईक, विठ्ठलराव बांद्रे, बाबासाहेब गलांडे, बबनराव उघडे, गोरखनाथ वेताळ, आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com