शेतीच्या वादातून शेतकर्‍याची आत्महत्या

12 जणांविरूद्ध गुन्हा दाखल
शेतीच्या वादातून शेतकर्‍याची आत्महत्या

पैठण |प्रतिनिधी| Paithan

तालुक्यातील गेवराईबार्शी येथे शेतीच्या वादातून एका 70 वर्षीय शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.31) घडली, घटनास्थळी मयताने लिहीलेली तीन पानाची सुसाईड नोट आढळी त्यावरून एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात 12 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेषराव सोमाजी खुटेकर(70, रा. गेवराई बार्शी, ता. पैठण) असे आत्महत्या केेलेल्या शेतकर्याचे नाव आहे. तर या प्रकरणी भाऊसाहेब खुटेकर, बन्सी खुटेकर, मच्छिंद्र खुटेकर, मनोज खुटेकर, अशोक खुटेकर, दिपक खुटेकर, विकास खुटेकर, रविंद्र खुटेकर, मिनाबाई खुटेकर, अर्चना खुटेकर, राणी खुटेकर, सिंधुबाई खुटेकर (रा. सर्व गेवराईबार्शी, ता. पैठण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी अरूण शेषराव खुटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेषराव खुटेेकर यांची गट नंबर 235 मध्ये साडेपाच एकर शेती आहे. या शेतजमिनीवरून भावकीतील भाऊसाहेब खुटेकर व इतर यांचा शेतीचा वाद न्यायालय पैठण व तहसिल कार्यालयात चालू आहे. यातून सर्व संशयित हे नेहमीच शेषराव खुटेकर यांना मानसिक त्रास देत जिवे मारण्याच्या धमक्या देत होते. त्यांनी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी शेषराव यांच्या शेतात अनाधिकृत पणे शेतात प्रवेश करून शेषराव खुटेकर यांना मारहाण केली होती.

30 ऑगस्टला शेतात जेसिबीसह ट्रॅक्टर आणुन खोदकाम करून शेतात अतिक्रमण केले. संशयितांकडून होणार्या सततच्या जाचास कंटाळून शेषराव यांनी बुधवारी सकाळी 6.50 वाजता राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने घराच्या छतास गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एम आय डी सी पोलिसांनी 12 आरोपी विरूद्ध कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एम आय डी सी पैठण पोलिस करीत आहेत.

नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात गोंधळ

सुसाईड नोट मध्ये मयत खुटेकर यांनी याप्रकरणात 12 संशयित व एमआयडीसी पोलिसांसह तहसीलदार, काही कर्मचारी यांचे नाव नमुद केले आहेत. याच सुसाईड नोट मधील नावे असणा-यावर देखील गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात अधिकार्यांना धारेवर धरले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल नेहूल, पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर पवार,पाचोड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरवसे, गणेश शर्मा यांनी नातेवाईकांना समजविण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com