शेततळ्यासाठी 75 हजारांपर्यंत अनुदान

शेततळ्यासाठी 75 हजारांपर्यंत अनुदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍यांना शेततळे योजनेसाठी 50 हजार ऐवजी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याबाबत राज्य सरकारने घोषणा केली होती. त्यानुसार याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आल्याने अधिक अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती नंतर सरकारने शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाणीटंचाईच्यादृष्टीने शेततळे उभारण्यासाठी योजना आणली. राज्य सरकारकडून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे. शेतात पाणी साठवून ठेवत ठिबक पद्धतीने पाणी देऊन अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती आज समृद्ध बनवली आहे. आता हेच शेततळे आता शेतकर्‍यांसाठी दुहेरी वरदान ठरलंय. मत्स्य पालन योजनेमुळे पाणीसाठा करणार्‍या या तळ्यातून आता नवा जोडधंदा शेतकर्‍यांना मिळाला आहे. त्यात आता अनुदानात आणखी वाढ झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com