शेतीचे वीजबिल न भरल्यास बत्तीगूलची शक्यता

महावितरण : 1 कोटी 96 लाखांचे बिल थकीत
शेतीचे वीजबिल न भरल्यास बत्तीगूलची शक्यता

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांकडे शेतीपंपाच्या विजेची थकबाकी 1 कोटी 96 लाख रुपये झाल्याने तालुक्यातील

महावितरणसमोर वसुलीसाठीचा मोठा संकट निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांनी शेती पंपाचे चालू वीजबिल मार्चअखेर न भरल्यास महावितरणकडून पुन्हा एकदा बत्ती गुल केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाथर्डी तालुक्यात एकूण शेतीपंपाचे 23 हजार वीज ग्राहक असून या शेती पंप ग्राहकांकडे शेतीपंपाची 1 कोटी 96 लाख रुपये थकबाकी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात ही थकबाकी वसूल करायची कशी असा मोठा प्रश्न महावितरण समोर आहे. मार्चअखेर चालू थकबाकी वसुली न झाल्यास महावितरणच्या अधिकार्‍यांच्या पगारामधून देखील वसुली करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू वीजबिल भरले तर तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा सुरळीत सुरू राहू शकतो. परंतु जर शेतकर्‍यांनी चालू बील भरण्याबाबत हलगर्जीपणा केला, तर पुन्हा एकदा शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो आणि तशा पद्धतीचे हालचाली देखील महावितरणकडून सुरू असल्याची माहिती समजली आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने ज्या शेतकर्‍यांच्या विहिरीत थोड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध आहे अशा शेतकर्‍यांकडे भुईमूग, कांदा, मका तसेच संत्रा, मोसंबी डाळिंबाचे देखील फळबागा आहेत. उन्हाच्या तडाख्यात या फळबागा जगवणे देखील महत्त्वाचे असल्याने अशा परिस्थितीत महावितरणकडून थकबाकीचे कारण पुढे करून वीज खंडित होऊ नये याची देखील खबरदारी शेतकर्‍यांना घ्यावी लागणार आहे.

पाथर्डी तालुक्यात 23 हजार शेती पंपाचे वीज ग्राहक असून त्यांच्याकडून 1 कोटी 96 लाख रुपयांची विजेची थकबाकी येणे आहे, असे असले तरी लाभधारक शेतकर्‍यांनी चालू वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.

- निलेश मोरे, उपकार्यकारी अभियंता पाथर्डी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com