शेताच्या वादावरून महिलेस शिवीगाळ

सुरेगावच्या आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल
शेताच्या वादावरून महिलेस शिवीगाळ

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील सुरेगाव येथील विवाहित महिलेस शेतीच्या वादातून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देवून घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची हेडलाईट फोडून नुकसान केले. या प्रकरणी आठ जणांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच गावातील रहिवाशी असून एकमेकांचे नातेवाईक आहे. त्यांचे शेत एकमेकांजवळ आहे. त्यांचा शेतजमिनीचा वाद कोपरगाव येथील न्यायालयात सुरु आहे. दरम्यान फिर्यादी महिला व तिची मुलगी बुधवारी घरासमोर बसलेल्या असतांना आरोपी विशाल जाधव व जितेश जाधव, अनोख अनिल जाधव, पुष्पा अनिल जाधव, सोनम अनोखा जाधव, पिंकी जितेश जाधव, रिंकी विशाल जाधव, अनिल देवानंद जाधव आदी आठ जणांनी हातात काठ्या घेऊन कोर्टात दाखल असलेल्या शेत वाटपाच्या कारणावरून व तू आम्हाला न विचारता खिडकीचे दुरुस्तीचे काम का केले असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करून घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची हेडलाईट फोडून नुकसान केले.

याप्रकरणी प्रमिला जॉन जाधव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गु.र.क्रं. 271/ 2021 भा.दं.वी. कलम 509, 143, 147, 149 , 504, 506, 427 प्रमाणे वरील आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com