कौटुंबिक वादातून तरूणावर हल्ला

Crime
Crime

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने तरूणावर हल्ला करण्यात आला. एमआयडीसीतील साईदीप कंपनीसमोर शुक्रवारी (दि. 4) दुपारी साडे बारा वाजता ही घटना घडली. भूषण राजेंद्र देवकाते (वय 28, रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) आणि आरोपी आदिनाथ सुरेश कुमरे (रा. केज, जि. बीड. हल्ली रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) यांच्यामध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाले.

आदिनाथ कुमरे याने या वादातून भूषण देवकाते याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. देवकाते यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी रूग्णालयात दिलेल्या जबाबावरून आरोपी आदिनाथ कुमरेविरोधात जबरी दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक संदीप चव्हाण या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com