बनावट प्रतिनिधींच्या प्रोसिडिंगवर खोट्या सह्या; मुसळवाडी पाणीयोजनेच्या बैठकीत सदस्यांचा आरोप

बनावट प्रतिनिधींच्या प्रोसिडिंगवर खोट्या सह्या; मुसळवाडी पाणीयोजनेच्या बैठकीत सदस्यांचा आरोप

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

दोन महिला सदस्य गैरहजर असताना संबंधितांनी बनावट प्रतिनिधी हजर करून प्रोसिंडिंगवर खोट्या सह्या करत गुप्त पध्दतीने मतदान घेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे काहीकाळ गोंधळ निर्माण करून खोट्या सह्या केल्याचे लक्षात येताच मतदान प्रक्रिया रद्द करून त्या ठिकाणाहून पळ काढला.

अशा बनावट प्रतिनिधीचा कुठलाही संबंध नसताना निवड प्रक्रियेत खोट्या सह्या करणार्‍या बनावट प्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मुसळवाडीसह 9 गाव प्रादेशिक पाणीयोजनेचे सदस्य तथा सरपंच अमृत धुमाळ व सदस्यांनी केली आहे.

या योजनेवर पाच महिला सदस्य असताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी तीनच महिला सदस्य हजर होत्या. परंतु त्या मध्ये दोन महिला गैरहजर असतानाही त्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्या. तरी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे.

- सारिका घोलप, सदस्या, मुसळवाडी.

ही योजना सुरू झाल्यापासून कोपरे व शेनवडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे पूर्वीपासून तीन सदस्य या योजनेवर असताना परंतु हा तिसरा सदस्य आला कुठून? या वादाला कुठलेही तथ्य नाही. ही चुकीची भूमिका आहे.

- नानासाहेब जाधव, सरपंच कोपरे

अध्यक्षपदाची निवड लोकशाही पध्दतीने व शांतपणे पार पडावी ही इच्छा आहे. पंरतु संबंधितांनी बनावट प्रतिनिधी हजर करून प्रोसेडिंग वर खोट्या सह्या करुन निवड प्रक्रियेचा भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब निवडणूक प्रक्रियेला धरून नसल्यामुळे त्यांच्यावर निवडणूक प्रक्रिया अंतर्गत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, या मागणी साठी लवकरच योजनेच्या सदस्यांसह राहुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची भेट घेणार आहोत.

- अमृत धुमाळ, सदस्य, मुसळवाडीसह नऊगांव पाणी योजना.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com