खोट्या सह्या करून १६ लाख रुपयांची फसवणूक

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या काष्टी शाखेतील प्रकार
खोट्या सह्या करून १६ लाख रुपयांची फसवणूक

काष्टी | Kasthi

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या काष्टी शाखेत सहकार महर्षी काष्टी सोसायटीचे विद्यमान संचालक विठ्ठल जगन्नाथ काकडे यांनी दिनांक 02/08/2022 रोजी कुटुंबातील व्यक्तींच्या बोगस व बनावट सह्या करून कॅशियर ए यार गोपाळ घरे. यांना दमबाजी करून जबरदस्तीने बँकेतून सोळा लाख रुपयेची फसवणूक केली आहे.

तसेच सहकार महर्षी काष्टी सोसायटीच्या आवारात असलेल्या बँकेच्या शाखेत बाथरूमला कुलूप लावून बँक अधिकाऱ्यास बाहेर काढून मानसिक त्रास दिला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तू इथे बँकेत कसा राहतो बँकेच्या दरवाजा कुलूप लावतो तू बाहेर कसा येतो व इथे कसा राहतो तेच मी पाहतो. तुझी अन्यत्र बदली करतो अशा प्रकारची धमकी विठ्ठल काकडे यांनी दिली.

या प्रकरणाची कसून चौकशी करून विठ्ठल काकडे यांच्यावर भारतीय दंड सहितेनुसार कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार ए यार गोपाळ घरे यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर तसेच पोलीस निरीक्षक श्रीगोंदा , कार्यकारी संचालक जिल्हा बँक, अहमदनगर, तालुका विकास अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com