खोट्या तक्रारदार, साक्षीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पोलीसही न्यायालयाच्या आदेशाची दखल घेत नसल्याचा आरोप
खोट्या तक्रारदार, साक्षीदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीने खोटी तक्रार दाखल करणार्‍या तक्रारदार व साक्षीदारांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. परंतु पोलीसांनीही अद्याप कारवाई न केल्याने याबाबत पोलीस अधिक्षकांसह वरिष्ठ अधिकारी व गृहमंत्र्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी पारनेर तालुक्यातील जवळे येथील रामदास घावटे यांनी निवेदन दिले आहे. घावटे यांच्या विरोधात दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटी व विनयभंगाच्या गुन्ह्यातून अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने निर्दोष करून खोटी फिर्याद व साक्ष देणार्‍या पाच जनांवर कारवाईचे आदेश पोलिस उपअधिक्षक अ .नगर ग्रामीण अजित पाटील यांना दिले होते. परंतु पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही यानंतर घावटे यांनी याबाबत वरीष्ठ पोलीस अधिकारी व न्यायालयात याबाबत तक्रार नोंदविली होती.

विषेश सत्र न्यायालय यांनी या खटल्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी . कारण असले खोटे गुन्हे दाखल करून यांच्यासारखे फिर्यादी व साक्षीदार स्वतः चा हेतु साध्य करण्यासाठी न्यायालयीन यंत्रनेचा गैरवापर करताना आढळले आहेत. भविष्यात कायद्याची भिती राहील. व असले प्रकार थांबतील असा स्पष्ट अभिप्राय निकाल पत्रात नोंदवला होता.

परंतु 10 महीने होवूनही कारवाई झाली नाही म्हणून रामदास घावटे यांनी गृहमंत्रालय , पोलिस महासंचालक , महानिरीक्षक यांच्या कडे तक्रार दाखल केली असून कारवाई न झाल्यास महीणाभरानंतर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com