कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

बनावट नोंदी सह्या करून खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून तसेच खातेदाराकडून खात्यामध्ये पैसे घेऊन सरकारी खात्यात जमा न करता

स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरिता वापर केल्याप्रकरणी पोस्ट मास्तरवर कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .

दि. 1 सप्टेंबर 2017 ते दि. 30 सप्टेंबर 2019 च्या दरम्यान पोस्ट ऑफिस धारणगाव येथे तात्कालिक लोकसेवक आरोपी रवींद्र बाळासाहेब जाधव रा . बोलकी. पोस्ट करंजी. ता.कोपरगाव याने धारणगाव पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत असताना बनावट नोंदी सह्या करून खातेदारांच्या खात्यातून 40 हजार 200 रुपये परस्पर काढून तसेच खातेदाराकडून खात्यामध्ये पैसे घेऊन सरकारी खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक फायद्याकरिता वापर केला.

याप्रकरणी विनायक सोन्याबापू शिंदे, डाक निरीक्षक कोपरगाव उपविभाग रा. नाऊर, तालुका श्रीरामपूर यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपी रवींद्र जाधव याच्याविरूध्द भादंवि कलम 420,40 9 , 468 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत .