तोतया पोलीस अधिकारी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

नाव बदलून होता वावरत || गडचिरोली पोलीस नावाने ओळखपत्रही
तोतया पोलीस अधिकारी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नोकरीच्या आमिषाने (Job Lure) सर्वसामान्य नागरिकांना फसविणार्‍या तोतया पोलीस (Fake Police) अधिकार्‍याला कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस दलात नोकरीला लावून देतो असे सांगून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील एकाची फसवणूक करणार्‍या आरोपीला कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड जवळून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर वाणी (वय 32 वर्ष, रा.चिचोंडी खुर्द, पारेगाव रोड, ता.येवला, ह.रा. आयटीआय कॉलेज जवळ, बुरुडगावरोड, नगर) असे आरोपीचे नाव आहे.

तोतया पोलीस अधिकारी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
पार्टनरशीपमधील दोन कोटी हडपले

भगवान बोराडे (वय 37 वर्ष धंदा वाहक, रा. सिल्लोड, ता. सिल्लोड) यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, एप्रिल 2023 मध्ये सचिन पाटील (रा. निफाड) याने पोलीस अधिकारी आहे, अशी बतावणी करुन फिर्यादीचा भाचा जय राजू सुसरे व चुलत भावजयी सोनाली बोरुडे या दोघांची नोकरीच्या आमिषाने (Job Lure) फसवणूक केली होती. फिर्यादीकडून वारंवार फोन-पे वरून 25 हजार रुपये घेतले होते. तसेच इतर लोकांकडूनही पैसे घेऊन त्यांची फसवणूक (Fraud) केली होती.

तोतया पोलीस अधिकारी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
तीन दिवसासाठी 800 जण होणार हद्दपार

कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) याबाबत गुन्हा दाखल (Filed a Case) झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. फसवणूक करणारा नाव बदलून वावरणारा आरोपी सचिन पाटील हा मार्केट यार्डच्या मेन गेटजवळ उभा असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची (Accused) कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तोतया पोलीस अधिकारी नाव बदलून वावरत होता तसेच त्याने पोलिसांसारखे दिसणारे गडचिरोली पोलिसांचे (Gadchiroli Police) ओळखपत्र ही तयार केले होते.

तोतया पोलीस अधिकारी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
सार्वमत संवाद : गौणखनिजातील ‘अडथळे’ मोडून काढणार
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com