आणखी एक संशयित पोलिसांच्या रडारवर

बनावट एनओसी प्रकरण || ठाकूर दोन दिवस कोठडीत
आणखी एक संशयित पोलिसांच्या रडारवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट एनओसी प्रकरणात मोठा सहभाग असलेला आणखी एक संशयित पोलिसांच्या रडारवर आला आहे. प्रस्ताव फेटाळल्यानंतर त्या प्रस्तावाच्या मंजुरीची बनावट एनओसी हा संशयित करून देत होता, असे तपासात समोर आले आहे. त्यामुळे कोतवाली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. राज्यातील काही भागात त्याच्या तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

या प्रकरणात सध्या 14 ते 15 जणांची चौकशी सुरू आहे. कोतवाली पोलीस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या साऊथ कमांडचे अधिकारी याचा तपास करत आहेत. राजा ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या राजा ठाकूर याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

ठाकूर याने बनावट एनओसी तयार करून दिलेली असल्याने त्यासाठी वापरलेली साधनसामग्री जप्त करायची आहे. त्याच्यासमवेत आणखी कोण कोण यात सहभागी आहेत, त्याची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकारी गजेंद्र इंगळे यांनी केली. न्यायालयाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com