बनावट एनओसी प्रकरण : धेंडवालला दोन दिवस पोलीस कोठडी

ठाकूर न्यायालयीन कोठडीत
बनावट एनओसी प्रकरण : धेंडवालला दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट एनओसी प्रकरणातील प्रमुख राजा ठाकूर याला वाढीव पोलीस कोठडी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी रोहन किशोर धेंडवाल याला दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मागील तीन ते चार दिवसांत पोलिसांनी धेंडवाल याच्याकडून केवळ दोन शिक्के व एक प्रिंटर हस्तगत केला आहे. बनावट एनओसी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला लॅपटॉप अद्यापही पोलिसांना मिळालेला नाही. दोन्ही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

तपासी अधिकारी कातकाडे यांनी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी केली. आरोपी ठाकूर व धेंडवाल या दोघांचाही प्रकरणात सहभाग आहे. आरोपीकडून लॅपटॉप हस्तगत करायचा आहे. तपासादरम्यान आरोपीकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाने मात्र ठाकूर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर धेंडवाल याच्या पोलीस कोठडीची मुदत दोन दिवसांनी वाढवून दिली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com