अकोले येथे बनावट विदेशी मद्य निर्मीती करणार्‍या दुकानावर छापा

राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांची कारवाई ; मुद्देमाल केला जप्त
अकोले येथे बनावट विदेशी मद्य निर्मीती करणार्‍या दुकानावर छापा

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) आणि पोलिसांनी (Police) केलेल्या कारवाईत मद्य विक्री (Alcohol sales) करणार्‍या येथील एका अधिकृत दुकानात बनावट विदेशी मद्य निर्मिती (Fake Foreign Liquor Production) केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्य बनविण्यासाठीचा 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून (Akole Police) मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विभागाचे विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर (Special Inspector General of Nashik Division B. G. Shekhar) यांना याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक (Police Team), राज्य उत्पादन शुल्क विभाग संगमनेर (State Excise Department Sangamner) यांनी अकोले पोलिसांच्या मदतीने आज (ता.30) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अकोले शहराच्या खटपट नाका चौकात असलेल्या बालाजी वाईन्स (Balaji Wines) या अधिकृत मद्यविक्री दुकानावर छापा (Raid) टाकला. यावेळी दुकानात चौघे परप्रांतीय नामांकित कंपनीच्या रिकाम्या मद्य बाटल्यांमध्ये देशी व विदेशी दारूचे मिश्रण केलेले मद्य भरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

या वेळी वेगवेगळ्या कंपनीच्या रिकाम्या व भरलेल्या बाटल्यांचा खच, त्याला सिलबंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या बुचासह अन्य सामग्री व मिश्रणातून तयार केलेले मुबलक प्रमाणातील मद्य पोलिसांच्या हाती लागले. यावेळी पथकाने बालाजी वाईन्स या दुकानातून 146 मद्याच्या रिकाम्या बाटल्या, बाटल्या हुबेहुब सिल करण्यासाठी आवश्यक असलेले 265 पत्र्याचे बुच, 14 ऑफीसर चॉईस मद्याच्या भरलेल्या मद्याच्या बाटल्या, ऑफिसर चॉईस ब्लू, रॉयल स्टॅग व मॅकडॉल्ड कंपनीची हुबेहुब बाटल्यांची बुचे, एक लिटर देशी दारु असलेल्या बारा बाटल्या. चिकटविण्याचा टेप, नरसाळे, गाळणी अशा अन्य साहित्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सविस्तर पंचनामा करुन ते ताब्यात घेतले.

नामांकित कंपन्यांचे बनावट मद्य तयार करुन ग्राहकांची फसवणूक करणार्या या दुकानाचा व्यवस्थापक महेश लिंगय्या हिरेचगिरी, सदरचा बनावट माल तयार करणारा साईकिरण बल्यागडम व प्रशांत गौड मुंजा आणि शंकर अंजगैर वन्हेला (सर्व रा.तेलंगणा, ह.मु.अकोले) हे कामगार अशा एकूण चार जणांना पहाटेच ताब्यात घेण्यात आले. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आज त्या चौघांनाही संगमनेरच्या उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या हवाली करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आज सकाळपासूनच या दुकानाची झाडाझडती सुरु करण्यात आली असून स्वतंत्र गुन्हाही दाखल केला जाणार आहे. या वृत्ताने अकोल्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून अशाप्रकारे तयार केलेला माल जिल्ह्यात कोठे कोठे मिळतो याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेले आरोपी या दुकानाचे मूळमालक नाहीत, ते केवळ पगारी पद्धतीने सदरचे दुकान चालवित होते असे समजते. अकोल्यातील हे एकमेव किरकोळ विदेशी मद्य विक्रीचे दुकान असल्याने या दुकानात नेहमीच मद्यशौकीनांची मोठी गर्दी असते. बनावट मद्य निर्मिती प्रकार उघडकीस आल्यामुळे मद्य प्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com