बनावट कागदपत्रे तयार करून घेतले सिमकार्ड

व्यावसायिकांची फसवणूक || कोतवालीत गुन्हा
बनावट कागदपत्रे तयार करून घेतले सिमकार्ड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट आधारकार्ड व फोटोचा वापर करून एका व्यावसायिकाच्या नावे बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी बबनराव शेळके (वय 40 रा. सुखकर्ता कॉलनी, कायनेटी चौक) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार जिल्ह्यातील अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी शेळके हे 3 सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या घरी असताना ते वापरत असलेले बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड अचानक बंद पडले. त्यांनी 4 सप्टेंबर रोजी नंबरबाबत बीएसएनएल कार्यालयात जावून चौकशी केली.

त्यावेळी त्यांना समजले की, नंदुरबार जिल्ह्यातील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शेळके यांचे बनावट आधार कार्ड नंबर, फोटो व नाव व कागदपत्रे वापरून शेळके यांच्या नावे असलेले सिमकार्ड खरेदी केले. ते एअरटेल कंपनीत पोर्ट करून फसवणूक केली आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com