
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
कर्जुले हर्या येथील 2 एकुर जमीनीच्या खरेदीचा व्यवहार तोतया व्यक्ती उभी करून तसेच बनावट कागदपत्र बनवून करण्यात आल्याचा प्रकार पारनेर दुय्यम निंबधक कार्यालयाच्या चौकशीत उघडकीस आला. या प्रकरणी 7 जणांवर पारनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बन्सीलाल करवर्माचंद (रा.आणे, ता. जुन्नर), अर्जुन गोंविद शिर्के व दत्ताञय नामदेव काळे दोघे (रा.कर्जुले हर्या), साक्षीदार बबन राधु उंडे (रा.कर्जुले हर्या), रामदास पिरता काळे, सतिश मोहन औटी, सुरेंद्र बिरु मान अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत दुय्यम निंबधक कार्यालयातील कर्मचारी दिलीप गोंविंद गायकवाड यांनी पारनेर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पारनेर तहसिल कार्यालयात अरुण रावबा आंधळे रा. कर्जुले हार्या यांनी जुलै 2022 मध्ये तक्रार अर्ज दिला होता.
त्यानुसार मौजे कर्जुले हर्या येथील गट नं - 155 मधील क्षेत्र 77 आर या जमीनीचे खरेदीखत 1 जुन 2022 रोजी झाले असुन हे खरेदी खत बनावट आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी असा असे त्यात म्हटले होते. तहसिलदारांनी दिलेल्या आदेशानुसार दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिकार्यांनी चौकशी केली असता यामधील शेम जमीनीची विक्री करणारे बन्सीलाल करवमचंद (रा.आणे ता. जुन्नर) यांनी नाम सांधर्म्याचा वापर करून बन्सीलाल लखमीचंद यांच्या जमनीची विक्री केली.
तर खरेदी घेणार अर्जुन गोंविद शिर्के व दत्तात्र्य नामदेव काळे यांनी कटात सहभागी होत सदर जमीनी खररेदी केली. बबन राधु उंडे, रामदास पिरता काळे, सतिश मोहन औटी, सुरेंद्र बिरु माने हे साक्षीदार होऊन या कटामध्ये सामिल झाले होते. या सर्वांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.