खोटा धनादेश दिल्याप्रकरणी कर्जदारास 6 महिने तुरुंगवास

खोटा धनादेश दिल्याप्रकरणी कर्जदारास 6 महिने तुरुंगवास

पोहेगाव |वार्ताहर| Pohegav

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील चंद्र पंढरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पोहेगाव या संस्थेला कर्जाच्या परतफेडीसाठी खातेदार बाबासाहेब अहिलाजी बनसोडे यांनी दिलेला चेक न वटल्यामुळे कोपरगाव कोर्टाने त्यांना सहा महिने कैदेची शिक्षा सुनावल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोहेगाव येथील चंद्र पंढरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेकडून बाबासाहेब अहिलाजी बनसोडे यांनी कर्ज घेतलेले होते. कर्जाची परतफेड रक्कम संस्थेस भरणा करण्यासाठी त्यांनी चंद्र पंढरी संस्थेला 1 लाख 57 हजार 500 रुपयाचा धनादेश दिलेला होता. परंतु सदर धनादेश न वटल्यामुळे वारंवार त्यांना सांगून देखील त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे चंद्र पंढरी संस्थेने धनादेश न वटल्याप्रकरणी कोपरगाव येथील फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट 138 प्रमाणे एससीसी नं. 423/2018 नुसार दावा दाखल केला होता.

सदर दाव्याच्या कामकाजात चौकशी अंती बाबासाहेब अहिलाजी बनसोडे हे दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा सिध्द होऊन कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एम. बनसोड यांनी आरोपीस सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व फिर्यादी संस्थेस 1 लाख 57 हजार 500 रुपयाची भरपाई देण्याचा आदेश दिला व नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्यास आरोपीस पुन्हा 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याकामी चंद्रपंढरी पतसंस्थेच्यावतीने अ‍ॅड. बी. ए. सोनवणे यांनी काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com