फेसबुकवर अश्लिल व्हिडिओ अपलोड करणार्यावर गुन्हा
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महिलेने फेसबुक पेजवर टाकलेल्या व्हिडिओ मार्फिंग करून त्याठिकाणी अश्लिल व्हिडिओ अपलोड करत महिलेच्या व्हॉटस्अॅप नंबरवर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी राहाता तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेचे फेसबुकवर पेज आहे. या पेजवर सदर महिलेने लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले होते. एका अनोळखी व्यक्तीने त्या व्हिडिओमध्ये मार्फिंग करत अश्लिल व्हिडिओ अपलोड केला. फिर्यादी महिलेच्या फोटोखाली अश्लिल मजकूर लिहिला. त्याची व्हिडिओ क्लिप महिलेच्या व्हॉट्सअॅपवर पाठवली. त्यामुळे महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला.
या महिलेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यांनी पोलिसांत फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या मोबाईलधारकाविरूध्द विनयभंग आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.