फेसबुकवर वादग्रस्त मेसेज टाकणार्‍या तरुणास अटक; गुन्हा दाखल
सार्वमत

फेसबुकवर वादग्रस्त मेसेज टाकणार्‍या तरुणास अटक; गुन्हा दाखल

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी| Shrirampur

अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा चालू असताना त्याच्या फेसबुकवरून अयोध्येतील बाबरी मशिद पाडल्याबाबत वादग्रस्त विधान करून दोन जातीत व गटांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एका जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस काल पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये राहणारा तौफीक शब्बीर शेख याने त्याच्या फेसबुकवरून अयोध्येत असणारी बाबरी मश्जिद पाडल्यामुळे बाबरी मश्जिद तेरा कर्ज है हम पर असा मेसेज टाकला असून त्यावर अनेकांनी कमेंटही केले आहेत. कुत्तेकी मौत मारेंगे असा रिप्लायही दिला आहे. यामुळे दोन जातींमध्ये व गटामध्ये शत्रुत्व वाढवून शहरातील एकोपा धोक्यात आणून एकोपा टिकविण्यास बाधा होईल असे कृत्य केले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 1292/2020 प्रमाणे तौफीक शब्बीर शेख याचेविरुध्द भादंवि कलम 153 अ प्रमाणे जातीय तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवी करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com