अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची दिवाळी करणार गोड

पालकमंत्री मुश्रीफ : लवकर खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याचा प्रयत्न
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची दिवाळी करणार गोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आल्यानंतर दोन महिन्यांत करोनाची लाट (Corona Wave) आली. एका हंगामात चार चक्रीवादळ आणि अतिवृष्टी झाली. यामुळे सरकारचा सर्व पैसा वादळग्रस्त (Stormy) आणि करोनाग्रस्तांवर खर्च झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून लवकरच त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रामविकास मंत्री ( Minister for Rural Development) तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टीमुळे राज्यात 55 हजार हेक्टरवरील शेती बाधीत झाली असून नगर जिल्ह्यात 95 हजार 679 शेतकर्‍यांचे 70 हजार 594 शेती बाधित झाली आहे. यात 75 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. मनुष्यहानी, घरे पडली, गोठे पडले, पशूधन हानी, घरातील भांडीकूंडी वाहून गेले, शेत जमीन आणि विहीरी वाहून गेलेल्या शेतकर्‍यांना राज्य सरकारकडून भरपाई (Compensation to Farmers From the State Government) देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने (State Government) भरपाईच्या रक्कमेत वाढ केलेली असून जिरात शेतीमधील पिकांच्या नुकसानीपोटी 10 हजार रुपये प्रती हेक्टर, बागायत भागातील पिकांच्या नुकसानीपोटी 15 हजार रुपये हेक्टर आणि फळबागासाठी (Orchards) 25 हजार रुपये हेक्टर अशी भरपाई देण्यात येणार असून ही जास्ती जास्त दोन हेक्टरपर्यंत राहणार आहे. राज्याच्या अर्थ सचिवांशी याबाबत चर्चा झाली असून येत्या दोन-तीन दिवसात याबाबतचा शासन निर्णय येणार असून त्यानंतर नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर (Bank Account) नुकसानीच्या मदतीची एकरक्कमी मदत टाकण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दिवाळीपूर्वी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

लसीकरणासाठी विशेष मोहिम

जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत करोना लसीकरण मोहिमेला प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात करोनाचे सध्या 2 लाख डोस शिल्लक असून पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 67 टक्के असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 23 टक्के आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. यात सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी त्यांच्या गटात, गावात विशेष मोहिम राबवून सर्वदूर लसीकरण करावे, असे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले.

मिशन वासल्य अन् विरभद्र ताराबाई योजना

कोविडमुळे सुमारे 4 हजारांच्या जवळपास महिला भगिणी विधवा झालेल्या आहेत. या महिलांना मिशन वासल्य योजनेतून कसा लाभ मिळवून देता येईल, यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. या महिलांना भाऊबीजेची भेट म्हणून सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच या विधवा महिलांसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतून विरभ्रद राणी ताराबाई स्वयंसहाय्यता योजनेतून बिनव्याजी कर्ज पुरवठा उपलब्ध करून त्यांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिमी पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली.

करोनापासून दक्ष राहण्याची सुचना

सिंगापूर, लंडन, चायना, रशिया या ठिकाणी सध्या करोनाचे दुप्पट रुग्ण सापडत आहेत. आपल्याकडे सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी सर्व काही खुले करण्यात आलेले आहे. रस्त्यावर गर्दीचा महापूर आलेला आहे. पर्यटन वाढलेले आहे. यामुळे नागरिकांनी करोनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सुचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

100 कोटीतून कोविड उपाययोजना

जिल्ह्यात करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केला. यात आतापर्यंत बाधीत आणि बरे झालेले रुग्ण आणि त्यांची संख्या, करोनात मुत्यूमुखी पडलेल्यांची संख्या, आतापर्यंत झालेल्या करोनाच्या चाचण्या याची माहिती देवून जिल्हा नियोजन समितीमधून 153 कोटी रुपयांतून कोविड उपाययोजना करण्यात येत आहेत. यात 100 कोटींची कामे झालेली असून यात 14 ऑक्सिजनचे पीएसएल प्रकल्प, सर्व ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारिकरण, 14 ठिकाणी जनरेटर आणि एक्सप्रेस फिडर, 1 हजार 750 नवीन ऑक्सिजन सिलेंडर, 50 ड्यूरा सिलेंडर, जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन टँक यांचा समावेश आहे. यासह आणखी 50 कोटींची कामे प्रस्ताविक करण्यात आली असून करोनाच्या तिसर्‍या लाटेशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com