घोड नदीपात्रातून बेसुमार माती उपसा

घोड नदीपात्रातून बेसुमार माती उपसा

महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष ; नागरिक त्रस्त

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) - तालुक्यातील माठ, राजापूर गावच्या हद्दीतून वाहणार्‍या घोड नदीच्या पात्रात बेसुमार माती (पोयटा) वाहतूक विनापरवाना सुरू आहे. कुठलीही परवानगी नसताना सुमारे 30 ते 40 जेसीबी व पोकलॅनच्या सहाय्याने खोदकाम करून सुमारे दोनशे ट्रॅक्टर, ट्रक, डंपरने वीट भट्टीसाठी या मातीची वाहतूक केली जात आहे. आतापर्यंत महसूल यंत्रणेने कुठलीच कारवाई केली नसल्याने राजकीय सांगड आणि महसूल प्रशासनाचे लागेबांधे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मात्र गावातील सर्वसामान्य नागरिक वाहनाच्या वर्दळीमुळे आणि उडणार्‍या धुळीने त्रस्त झाले आहेत.

श्रीगोंदा तालुक्यात शिरूरच्या दिशेने घोड नदी प्रवेश करते. या घोड नदीच्या पात्रावर चिंचणी धरण आहे. या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणारे माठ गावच्या हद्दीत घोड नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणत वाळू आणि वीट भट्टी साठी लागणार पोयटा माती आहे. सध्या नदीच्या पात्रातील पाणी आटले असल्याने या भागात असणार्‍या शेकडो वीट भट्टी चालकांनी या नदीच्या पात्रातून विनापरवाना महसूल बुडवून मातीचा उपसा सुरू केला आहे.

नदीच्या पात्रात जेसीबी, पोकलॅनच्या साह्याने मागील एक महिन्यापासून लाखो ब्रास मातीचा उपसा राजरोसपणे सुरू आहे. महसूल यंत्रणा याबाबत कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने गावातील नागरिक या सर्व प्रकारामुळे त्रस्त झाली आहे. दिवस रात्र या मातीचा उपसा होत असल्याने याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Related Stories

No stories found.