बदल्यांसाठी 10 ऑगष्टपर्यंत मुदतवाढ
सार्वमत

बदल्यांसाठी 10 ऑगष्टपर्यंत मुदतवाढ

करोनामुळे बदल्या होणार नाही, असे आरंभी जाहीर करण्यात आले होते

Nilesh Jadhav

संगमनेर | वार्ताहर | Sangmner

राज्य शासनाच्यावतीने यापूर्वी देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्यासाठीच्या मुदतीमध्ये राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल केला असून आता त्या बदल्या 10 ऑगस्टपर्यंत करता येणार आहेत.

करोनामुळे बदल्या होणार नाहीत, असे आरंभी जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने पुन्हा बदल्यांच्या धोरणात बदल करून 31 जुलैपर्यंत बदल्या करण्याचे आदेश दिले होते. राज्यांची करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची परिस्थिती वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने सदरच्या बदल्या 10 ऑगस्टपर्यंत करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे सध्या जिल्हा व राज्य स्तरावर सुरू असणारी कर्मचार्‍यांची धावपळ काहीशी थांबणार आहे.

यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाने कर्मचार्‍यांच्या बदल्यांसंदर्भात आदेश दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने स्वतंत्र आदेश निर्गमित करत सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या मुदतीतच बदल्या करण्याचे आदेश केले होते. सामान्य प्रशासन विभागाने आता मुदतवाढ दिल्यामुळे ग्रामविकास विभागाच्या बदल्यांना ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहेत. त्या संदर्भात ग्रामविकास विभाग स्वतंत्र आदेश निर्गमित करेल, अशी शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com