नाशिक विभागातील तलाठी संवर्गाच्या ७५४ अस्थायी पदांना मुदतवाढ

नगर जिल्ह्यातील 173 अस्थायी पदांचा समावेश
नाशिक विभागातील तलाठी संवर्गाच्या ७५४ अस्थायी पदांना मुदतवाढ

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

नाशिक विभागातील तलाठी संवर्गाच्या ७५४ अस्थायी पदांना 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. यात नगर जिल्हयातील 173 अस्थायी पदांचा समावेश आहे.

नाशिक महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या 2118 पदांचा आकृतीबंध राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. या पदांपैकी 754 पदे ही अस्थायी असून त्यांना दि.01 जाने 2020 ते दि. 31 ऑगस्ट 2020 या कालावधी करीता मुदतवाढ देण्यात आलेली होती. सदरची मुदत संपुष्टात आल्याने वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या अखत्यारितील अस्थायी पदांना दि.01 सप्टेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी नाशिक विभागातील तलाठी संवर्गाच्या 754 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची शासनाकडे विनंती केली होती. त्यामुळे नाशिक विभागातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांपैकी कोणतेही पद 6 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी रिक्त नसल्याचे विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी प्रमाणित केल्याने नाशिक विभागातील तलाठी संवर्गाच्या एकूण 754 अस्थायी पदांना दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत चालू ठेवण्यास या मंजूरी देण्यात आली आहे.

नाशिक विभाग एकूण मंजूर पदे...

(अ.क्र.-जिल्हा-मजूर पदे-स्थायी पदे-अस्थायी पदे)

1) नाशिक- 550 - 336 - 214

2) धुळे - 233 - 150 - 83

3) नंदुरबार - 230 - 132 - 98

4) जळगाव - 522 - 336 - 186

5) अहमदनगर - 583 - 410 - 173

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com