भरमसाठ खर्च व कमी भावामुळे तरुण पिढीची शेतीबाबत अनास्था

भरमसाठ खर्च व कमी भावामुळे तरुण पिढीची शेतीबाबत अनास्था

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

आधुनिक शेतीकडे वळत असताना शेतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. शेतात राबणाराची संख्या कमी झाल्याने यांत्रिकीकरण आले असेल तरी त्यासाठी लागणारा खर्च काही कमी नाही. शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेती निगडीत सर्व वस्तूचे भाव वाढले असल्याकारणाने भविष्यात तरुण पिढी शेतीकडे पाठ फिरवेन की काय? असा प्रश्न ग्रामीण भागात आताच दिसू लागला आहे.

पूर्वी शेतकरी कमी पावसामुळे भुसार पिके आपल्या शेतीत घ्यायची, त्यात ते समाधानी होते. दोन वर्षांपासून या भागात पाऊस चांगला पडला, त्यात शेतकर्‍यांनी नगदी पिकांना पसंती दिली.त्यात प्रामुख्याने ऊस पीक शेतकर्‍यांनी निवडले, पण सुरवातीच्या काळात उसाचा भाव कमी होता, पण उत्पादन खर्च कमी असून उत्पादन चांगले मिळत होते. आता त्या उलट होऊन गेले. भाव बर्‍यापैकी मिळत असला तरी खर्च भरमसाठ वाढला आहे. त्यात ऊस पीक तसे पाहिले तर अकरा ते बारा महिन्याचे पीक आहे. पण सर्वच शेतकरी उसाकडे वळले. मग जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना अमाप ऊस क्षेत्र झाले. यावर्षी तर या कारखान्यांना ऊस गाळप होते की नाही हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यात शेती निगडीत सर्वच दर हे गगनाला भिडले आहे. बी बियाणे, कीटकनाशके, तणनाशके औषधांचे देखील भरमसाठ वाढले आहे. शेतमजुरी, डिझेलचे दर वाढल्यामुळे शेती निगडीत ट्रॅक्टरचे दरदेखील वाढले आहे. शेतीत होणारा खर्च पाहता उत्पादन बर्‍यापैकी होते, पण भाव कमी मिळत असल्याकारणाने शेती व्यवसाय तोट्यात दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात तरुण पिढी शेतीकडे पाठ फिरवतील की काय? असा प्रश्न सध्या वयोवृद्ध शेतकर्‍यांना पडला आहे.

आमच्या काळात बैलांच्या साहाय्याने शेतीची मशागत व्हायची. बैलांची जागा ट्रॅक्टर नावाच्या मशीनने घेतली. मग शेती व्यवसाय महागडा होत गेला. शेणखताचा वापर करून आमची शेती सुपीक ठेवली, पण आता रासायनिक खतांचा अमाप वापर होत असल्याने भविष्यात शेती नापीक होते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या काळात कीटकनाशके, तणनाशकांची फवारणी होत नव्हती, त्यामुळे अन्नधान्य पोषक होते, पण आता या फवारण्यांमुळे आज आपले आयुष्य निश्चितच कमी करून घेत आहे याची देखील मोठी खंत आहे.

- रंगनाथ पडोळ शेतकरी, पाचेगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com