अन् उर्जामंत्री तनपुरे मोहात पडले..

अन् उर्जामंत्री तनपुरे मोहात पडले..

श्रीरामपूर, |प्रतिनिधी| Shrirampur

रोजच्या व्यायामामुळे माणूस किती तंदुरुस्त राहतो. याचे प्रात्यक्षिक उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अनुभवले. अन् ते देखील जीमच्या मोहात पडले. आम्हा तरूणांसाठी हा अनुभव प्रेरणादायी असल्याचे गौरवोेद्गार उर्जामंत्री तनपुरे यांनी काढले.

ना. तनपुरे यांनी शुक्रवारी श्रीरामपूर दौर्‍यात महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी व नागरिकांची बैठक घेऊन अडचणी जाणून घेत सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मुरकुटे व त्यांच्यात कौटुंबिक चर्चा झाली. मुरकुटे यांनी स्व. बाबुरावदादा तनपुरे, माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या सहवासातील अनुभव तसेच संघर्षाचे किस्से सांगितले. आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य सांगताना मुरकुटे यांनी उर्जामंत्र्यांना स्वत:ची जीम दाखविली. वयाच्या 80 व्या वर्षी रोज वॉकींग, सायकलींग, डंबेल्स, जोर, बैठका असा दोन तास व्यायाम करत असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी व्यायामाचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.

मुरकुटे यांच्या जीममधील आधुनिक साहित्य तसेच त्यांचे प्रात्यक्षिक पाहून मंत्री तनपुरे प्रभावित झाले. यावेळी त्यांनाही व्यायामाचा मोह आवरला नाही. त्यांनी डंबेल्स हातात घेत थोडा वेळ व्यायाम केला. आपणही मुंबई येथे जीम लावली असून तेथे गेल्यावर व्यायाम करीत असल्याचे सांगितले. व्यस्त जीवनातून वेळ काढत आपण 80 व्या वर्षीही व्यायाम करता हे आम्हा तरुणांसाठी एक आदर्श आहे. आजच्या युवकांनी देखील मुरकुटे यांचे अनुकरण करून रोज व्यायाम करणे गरजेचे असल्याचे मंत्री तनपुरे यावेळी म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com