उत्पादन शुल्कच्या कर्मचारी महिलेचा विनयभंग

छापा टाकण्यास गेल्यानंतर घडला प्रकार: एकावर गुन्हा
उत्पादन शुल्कच्या कर्मचारी महिलेचा विनयभंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरामध्ये दारूचा साठा असल्याची खबर मिळताच छापा टाकण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातील महिला कर्मचार्‍याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी

एकाविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, विनयभंग कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. निलेश गोंविद आरडे (वय 34 रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. उत्पादन शुल्कच्या कर्मचारी महिलेने फिर्याद दिली आहे.

निलेश आरडे याने चेतना कॉलनी येथील त्याच्या राहत्या घरी देशी- विदेशी दारूचा साठा करून ठेवला असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली होती. खात्री करण्याकामी पथकाने गुरूवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आरडे याच्या घरी छापा टाकला. यावेळी आरडे याने घरझडती करण्यास नकार देत पथकातील कर्मचारी महिले सोबत अश्लील वर्तन करून हात पिरगळला. पथकातील इतर अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहे.

Related Stories

No stories found.