उत्पादन शुल्क विभागाचे दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी लाच मागितली
उत्पादन शुल्क विभागाचे दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

दारू विक्री चालू ठेवण्यासाठी 55 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोड अंती 35 हजारांची लाच स्विकारताना, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते व सहा दुय्यम निरिक्षक राजेंद्र भास्कर कदम या दोन अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे.

मंगळवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालू ठेवण्यासाठी दिनाक 27 जून रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम यानी मागील 11 महिन्यांचे बाकी हप्त्याचे 55 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच आरोपी नंदू चिंधु परते यांनी त्यांच्यासाठी दरमहा 5 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 29 जुन रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम याने 35 हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्यासमक्ष स्विकारतांना पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे, पो.ना. डोंगरे, पो.ना. इंगळे, पो. ना नितीन कराड, चालक विनोद पवार यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com