वृध्दा नदीतून बेसुमार वाळू उपसा, ‘महसूल’चे दुर्लक्ष

संग्रहित
संग्रहित

करंजी (वार्ताहर) - पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील आंधळेवस्ती येथील वृद्धानदीतून प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असुन दररोज 50 ते 60 ब्रास वाळूचा उपसा या नदीतून केला जात आहे. परंतु वाळू माफियांच्या दहशतीमुळे कोणीही थेट तक्रार करण्यास पुढे येत नाही. हा वाळू उपसा तात्काळ बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.

आजपर्यंत महसूल विभागाच्या मेहेरबानीने हजारो ब्रास वाळूचा उपसा या नदीच्या पात्रातून झालेला आहे. वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला स्वतःच्या शेतातून रस्ता मोकळी करून देत शेतकरी व वाळू माफीया गब्बर झाले आहेत.त्यांच्या विरोधात कोणी बोलण्यास गेले तर सदर वाळू माफीया दादागिरी करतात. वृद्धा नदीलगत हनुमान टाकळी येथील चार, पाथर्डी शहरातील दोन, जवखेडे खालसा येथील दोन असे आठ ट्रॅक्टर रात्रंदिवस वाळू उपसा करीत असल्याची माहिती या भागातील काही शेतकर्‍यांनी तहसीलदारांना दिली आहे.

वाळू चोरी करून सदर वाळू माफीया तीस ते चाळीस किलोमीटरपर्यंत वाळूचा पुरवठा केला करतात. सर्व नियम तोडून वाळूची वाहतूक केली जाते. चोरीचा वाळू पुरवठा इतक्या लांबपर्यंत होतोच कसा? सदर वाळू चोरीचा बंदोबस्त होणे अतिशय गरजेचे असल्याचे या भागातील नागरिकांची मागणी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com