अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार - आ. राजळे

नुकसानग्रस्त भागाचा दौरा, पंचनाम्याचे आदेश
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार - आ. राजळे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी (Pathardi) व शेवगाव (Shevgav) तालुक्यात 30 ऑगस्टच्या मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी (Heavy rain) होऊन अनेक गावे पाण्याखाली जाऊन व घरांत पाणी शिरल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी अनेक कुटुंबाना स्थलांतरित (Family Migrants) करावे लागले.शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याचे आदेश (Order) देण्यात आले आहेत. नुकसान झालेला अहवाल शासनाकडे घेऊन जाऊन मदत व नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार (Pursuit for compensation) असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे (MLA Monika Rajale) यांनी दिली.

सोमवारी रात्री सुमारे पाच तासांत पाथर्डी (Pathardi) व शेवगाव (Shevgav) तालुक्यात गेल्या तीस ते चाळीस वर्षातील विक्रमी पाऊस झाला. आ. राजळे (MLA Monika Rajale) यांनी झालेल्या सर्व नुकसानीची माहिती घेऊन पत्राद्वारे मुख्यमंत्री,पालकमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना तातडीने नुकसानग्रस्त भागाची सविस्तर माहिती देऊन पूरग्रस्तांना मदत कार्य व नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी ई-मेल द्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे.

तसेच शेवगाव (Shevgav) पाथर्डी (Pathardi) तालुक्यात ज्या कुटुंबीयांचे,शेतकर्‍यांचे शेती व पिके,पाळीव जनावरे,तसेच घरांचे नुकसान झाले यांचे तात्काळ पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत. त्याचबरोबर रस्ते,वाड्या जोड रस्ते, पूल, साठवण बंधारे, केटीवेअर, जलसंधारणाच्या कामांच्या झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्र देऊन तत्काळ मागणी केली असून या कामांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे खास बाब म्हणून पाठपुरावा करण्यात येईल असे आमदार राजळे (MLA Monika Rajale) यांनी सांगितले.

अतिवृष्टीनंतर सोमवारी रात्रीपासूनच आमदार राजळे यांनी दोन दिवस पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अतिवृष्टीने बाधित गावांची पाहणी करून नागरिकांना धीर देत मदतकार्य सुरू केले. मंगळवारी सकाळी सहा वाजता आमदार राजळे यांनी कोरडगाव, मुखेकरवाडी, औरंगपूर, आखेगाव, सोमठाणे, सुसरे, वरूर, भगूर, वडुले बुद्रुक, कोळसांगवी, पाथर्डी शहर,शेवगाव शहर या पूरग्रस्त गावाचा दौरा करून पुरात अडकलेल्या व घरांमध्ये पाणी शिरलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवून त्यांना जेवण,पाणी,निवारा याची स्वतः लक्ष देऊन व्यवस्था केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com