अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी वाहतूक व साखर घट उतारा अनुदान देणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय
अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी वाहतूक व साखर घट उतारा अनुदान देणार
साखर कारखाना

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) गळीत हंगाम (Crushing Season) 2021-2022 मधील अतिरिक्त ऊसाचे गाळप (Excess sugarcane crush) करण्यासाठी वाहतूक अनुदान (Transportation Grants) व साखर घट उतारा अनुदान (Sugar Reduction Extract Subsidy) देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

या निर्णयाप्रमाणे 1 मे 2022 पासुन गाळप होणाऱ्या व साखर आयुक्तालयाने अनिवार्य वितरित केलेल्या ऊसासाठी 50 किमी अंतर वगळून वाहतूक खर्च प्रति टन प्रति किमी दर 5 रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आला आहे.

तसेच ज्या सहकारी व खाजगी (शासन निर्णय 21 ऑक्टोबर 2011 ला एकवेळचा अपवाद म्हणून) साखर कारखान्यांच्या (इथेनॉलसाठी बी हेवी मोलॅसेस/ ऊसाचा रस वर्ग केलेला विचारात घेतल्यानंतर) प्रमाणित केलेल्या साखर उताऱ्यामध्ये 0.5 (अर्धा) टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घट आल्यास व अंतिम साखर उतारा 10 टक्के पेक्षा कमी आल्यास सरसकट सर्व कारखान्यांना प्रति टन 200 रुपये दराने 1 मे 2022 नंतर गाळप होणाऱ्या सर्व ऊसासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.