रस्त्याचे खोदकाम करणे पडले महागात; एकावर गुन्हा

मनपाचे बांधकाम अभियंता यांची फिर्याद
रस्त्याचे खोदकाम करणे पडले महागात; एकावर गुन्हा

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील रस्त्याचे विनापरवाना खोदकाम (excavation of city roads) करणार्या हाॅटेल चालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case at Kotwali police station) करण्यात आला आहे. राहुल रासकोंडा (पूर्ण नाव माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर (Ahmednagar Municipal Corporation Construction Department Branch Engineer Shrikant Nimbalkar) यांनी फिर्याद दिली आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील नगर- पुणे हा डांबरी रस्ता (Nagar Pune Road) हाॅटेल रेडीयंस (Hotel Radiance) जवळ खोदला असल्याची माहिती २१ जूनला ठेकेदार चंद्रशेखर म्हस्के यांनी अभियंता निंबाळकर यांना दिली. अभियंता निंबाळकर व बांधकाम विभागाचे मुकादम अशोक बिडवे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता सहा मीटर रस्ता खोदलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. याबाबत रासकोंडा यांना विचारणा केली असता टेलीफोनची केबल (telephone Cable) जोडण्यासाठी रस्ता खोदला असल्याचे त्याने निंबाळकर यांना सांगितले.

परवानगी घेतली नसल्याचेही रासकोंडा यांनी सांगितले. सदर प्रकरणी निंबाळकर यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore) यांना सविस्तर अहवाल सादर केला. आयुक्त गोरे यांनी २ जुलै रोजी रासकोंडा याला रस्ता खोदल्याकामी दंड भरण्याची नोटीस दिली. रासकोंडा याने दंड न भरल्याने उपायुक्त सचिन राऊत यांच्या आदेशानुसार निंबाळकर यांनी रासकोंडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com