परीक्षेसाठी नगरहून विशेष रेल्वे

परीक्षेसाठी नगरहून विशेष रेल्वे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुंबई व नागपूर येथे होणार्‍या जेईई व नीट परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नगर रेल्वे स्थानकावरून आज शनिवारी (दि. 5) दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

नागपूरला जाणारी गाडी नंबर 02167 ही रेल्वे दुपारी 4 वाजता नगर स्टेशनवरून सुटणार आहे. तर मुंबईला जाणारी गाडी नंबर 01132 हे शनिवारी रात्री 9 वाजता नगर रेल्वे स्थानकावरून सुटेल, अशी माहिती स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली आहे.

जेईई व नीट परीक्षांसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विशेष गाड्या नगरहून सोडण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे तिकीट अरक्षण निश्चीत झाले आहे. अशांनाच फक्त गाडीत प्रवेश दिला जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com