श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने शहीद स्मारकासाठी नगरपरिषदेकडे जागा मागितली होती.

परंतु नगरपरिषदेने मागितलेली जागा दिली तर नाहीच परंंतु चुकीचे वक्तव्य करून माजी सैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे शहीद स्मारकासाठी जागा मिळावी म्हणून त्रिदल सैनिक सेवा संघाच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. यावेळी अनेक संघटनांनी या उपोषणास पाठिंबा दिला. काल संध्याकाळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्विकारले. तसेच बुधवारी घटनास्थळी जाऊन आपसात चर्चा करून जागा मोजून घेऊ असे आश्वासन दिले.

गेल्या अनेक महिन्यांपासून शहीद स्मारकाच्या जागेसाठी त्रिदल सैनिक सेवा संघ नगरपरिषदेकडे मागणी करीत आहे. परंतु नगरपरिषद जागा देण्यास मज्जाव करीत आहे. सदरची मागणी केलेली जागा नगरपरिषदेच्या स्वमालकीची नसून जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाने हस्तांतरीत केलेली आहे. ही जमीन शासनाची आहे. आणि त्या पैकीच शहीद स्मारकासाठी माजी सैनिकांनी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागेमधून मागितली आहे.

परंतु नगर पालिकेस भारत देशाच्या / मातृभूमीच्या रक्षणार्थ ज्या जवानांनी आपला जीव गमावला व देशासाठी शहीद झाले अशा जवानांच्या शहीद स्मारकासाठी जागा देण्यास मज्जाव केला आहे व चर्चेमध्ये नगरपरिषदेस स्मारक महत्त्वाचे नसून नाना-नानी गार्डन व लव श्रीरामपूर महत्त्वाचे वाटते असे सैनिकांप्रती बेगडी प्रेम दाखविते जाते व शहीद स्मारकासाठी मागितलेली जागा ही अतिशय क्षुल्लक बाब असून यासाठी माजी सैनिकांना रस्त्यावर आंदोलनासाठी उतरावे लागते हे दुर्दैव आहे. नगरपरिषदेने अत्यंत चुकीचे वक्तव्य करून माजी सैनिकांच्या भावना दुखावून व देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांचा विश्वासघात केला आहे. म्हणून या शहीद स्मारकाच्या जागेसाठी एक दिवसीय लाक्षणीक उपोषण नगरपरिषदेसमोर सुरू केले.

या लाक्षणिक उपोषणासाठी रवीशाम बेलदार, मेजर कृष्णा सरदार, अनिल लगड, बद्रीनाथ देशमुख, छायाताई मोटे, उषा भवार, रुपाली डहाळे, संग्राम यादव यांच्यासह अन्य नागरिक उपोषणास बसले होते. या आंदोलनासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, नगरसेविका भारती कांबळे, किरण लुणिया, भाजपाचे प्रकाश चित्ते, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, सुभाष तोरणे, रितेश एडके, शिवसेनेचे सचिन बडधे, मिलिंदकुमार साळवे, भाऊराव माळी, शरद चव्हाण, अशोक चौधरी, नरेंद्रसिंग होडे, सचिन बडधे, एकलव्य संघ महाराष्ट्र, भिल्ल संघटना, परिवर्तन फाउंडेशन यांनी उपोषणास बसून आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी पालिकेच्याविरुध्द व सत्ताधार्यांच्या विरोधात घोषणा देत सैनिकांचा अपमान करणार्यांचा निषेध केला. काल संध्याकाळी 4 वाजता मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी आंदोलकांची भेट घेतली तसेच त्यांचे निवेदन स्विकारले. तसेच बुधवारी घटनास्थळी जाऊन आपसात चर्चा करून जागा मोजून घेऊ, असे आश्वासन दिले.

या आंदोलनासाठी उपनगराध्यक्ष करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, नगरसेविका भारती कांबळे, किरण लुणिया, भाजपाचे प्रकाश चित्ते, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, सुभाष तोरणे, रितेश एडके, शिवसेनेचे सचिन बडधे, मिलिंदकुमार साळवे, भाऊराव माळी, शरद चव्हाण, अशोक चौधरी, नरेंद्रसिंग होडे, सचिन बडधे, एकलव्य संघ महाराष्ट्र, भिल्ल संघटना, परिवर्तन फौंडेशन यांनी उपोषणास बसून आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी पालिकेच्याविरुध्द व सत्ताधार्यांच्या विरोधात घोषणा देत सैनिकांचा अपमान करणार्यांचा निषेध केला.