माजी आ. चौधरी यांचा कोपरगावात निषेध

माजी आ. चौधरी यांचा कोपरगावात निषेध

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार अवैध कामाची पाहणी करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी गेले असताना भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व इतर अधिकारी यांना माजी आमदार संतोष चौधरी यांनी अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करून अंगावर धावून जात शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

या घटनेचा कोपरगाव नगरपरिषदेमध्ये कार्यरत महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी यांचेकडून आज निषेध करण्यात आला.

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना याबाबतचे निवेदन देऊन निषेध करण्यात आला. माजी आमदार संतोष चौधरी यांना त्वरित अटक करून यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली.

यावेळी नाशिक विभाग व अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीचे तसेच कोपरगाव नगरपरिषद कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com