अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील प्रत्येक गावात अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. याचाच भाग म्हणून 1 हजार 316 गावातील

मागासवर्गीय वस्ती लोकसंख्याच्या प्रमाणात निधी देवून खुली व्यायाम शाळा उभारण्यात येणार आहे. राज्यात नगर जिल्ह्यासाठी हा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी दिली.

राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात योजना राबविण्यात येत आहे. यात या वस्त्यांमध्ये पाणी पुरवठ्याची कामे, मलनि:स्सरण, वीज, गटारी बांधणे, अंतर्गत रस्ते, पोहच रस्ते, समाज मंदिर बांधकाम या विकास कामांचा समावेश आहे. या योजनांमध्ये आता नगर जिल्ह्या पुर्ता खुल्या व्यायाम शाळेचा विशेष बाब म्हणून समावेश करण्यात आला आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनंी या योजनेस नगर जिल्ह्यासाठी मंजूरी दिली आहे. या योजनेत दलीत वस्तीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यात येणार असून त्यानूसार प्रत्येक गावात मागसवर्गीय वस्तीत खुली व्यायाम शाळा होणार आहे. साधारणपणे 10 ते 25 पर्यंत मागसवर्गीय लोकसंख्या असणार्या वस्तीसाठी 2 लाखांचा विकास निधी देण्यात येतो. गावात मागासगर्वीय लोकसंख्या अधिक असल्यास 20 लाखांपर्यंतचा निधी देखील मिळतो, असे सभापती परहर यांनी सांगितले. या योजनेसाठी साधारणपणे 8 कोटी रुपयांचा निधीची आवश्यकता असून जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये तरूण, तरुणी, महिला आणि पुरुष तंदूरूस्त राहण्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे. ही योजना तातडीने राबविण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन सभापती परहर यांनी केले आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावरून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.