गावातील प्रत्येक कुंटुबांला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला एक लाख रुपये निव्वळ नफा मिळायला हवा

जलसंधारण व रोहिओ अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या सीईओंना (CEO) नियोजन करण्याच्या सूचना
गावातील प्रत्येक कुंटुबांला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला एक लाख रुपये निव्वळ नफा मिळायला हवा

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

रोजगार हमी योजनेतंर्गत अधिकचे कामे देवून दारिद्रयरेषेखालील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी गावातील प्रत्येक कुंटुबांला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला निव्वळ नफा एक लाख रुपयापर्यंत मिळायला हवा यासाठी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावपातळीवर नियोजन करावे अशा सूचना राज्य शासनाच्या जलसंधारण व रोहिओ विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार (Water Resources and Rohio Additional Chief Secretary Nandkumar) यांनी केल्या आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (Mahatma Gandhi National Rural Employment Gurantee Scheme) ‘समृद्धी लेबर बजेट 2022-23’ (Samrudhi Labor Budget 2022-23) अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game), महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय नागपूरचे आयुक्त शान्तनू गोयल (Shantanu Goyal), नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Nashik ZP CEO Leena Bansod), अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (Ahmednagar ZP CEO Rajendra Kshirsagar), नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे (Nandurbar ZP CEO Raghunath Gawde), उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले (Deputy Commissioner (Rohyo) Dr. Arjun chikhale), उपजिल्हाधिकारी रोहयो नाशिक नितीन मुंडावरे (Nitin Mundavare), उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (Ravindra Pardeshi) आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील (Jalgaon CEO B. N. Patil) बैठकीस ऑनलाइन उपस्थित होते.

अपर मुख्य सचिव नंदकुमार पुढे म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध ’ आणि ‘गाव समृद्ध तर मी समृद्ध’ या विचारातून रोहयो कामांच्या ‘लेबर बजेट’ची आखणी करावी.कामाची गरज असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा काम देण्यात येवून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यात यावी, असे सांगून अपर मुख्य सचिव नंदकुमार म्हणाले, 'समृद्धी लेबर बजेट 2022-23’ अंतर्गत गावे समृद्ध करताना समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या योजनेची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, मजूर, महिला, तरुण या सर्वांना फक्त रोजगारासोबतच त्यांचे जीवन समृद्ध होणार असल्याची जाणीव करुन देणे आवश्यक असल्याचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले.

ग्रामीण भागात प्राधान्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत कृषी व निगडीत कामे घेतल्यास ग्रामीण भागाचा गतीने विकास होणार आहे. त्यामुळे या योजनेतंर्गत मिशन वॉटर कन्झरव्हेशन तालुक्यांमध्ये किमान 65 टक्के कामे मृद व जलसंधारणाची घेण्यात यावी. तसेच 60 टक्के कामे ही शेती विषयक व त्याच्याशी निगडीत घेण्यात यावी, जेणेकरुन या सर्व कामांमुळे गावांचा, तालुक्यांचा व जिल्ह्यांचा पाणी, जमीन, वृक्ष व जीवन यांचा विकास साध्य करता येईल, असेही अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले.

आयुक्त शान्तनू गोयल म्हणाले की, रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त मनुष्यबळ निर्माण करण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com