अत्यावश्यक सेवेकर्‍यांना करोना टेस्टिंग सक्तीची

अत्यावश्यक सेवेकर्‍यांना करोना टेस्टिंग सक्तीची

महापालिकेचे पथक करणार चेकिंग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरात लागू केलेल्या कडक निर्बंधातून सवलत मिळालेल्या अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना कोरोना टेस्ट करणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेच्या पथकामार्फत त्याचे चेकिंग केले जाणार आहे. आयुक्त शंकर गोरे यांनी आज मंगळवारी तसे आदेश काढले.

रविवारी आयुक्तांनी आदेश काढत नगर शहरातील किराणा दुकाने, मटन, चिकन विक्री करणारे दुकाने 1 जुनपर्यंत बंद केले. पूर्वीच्या निर्बंधात शिथिलता केल्यानंतर खरेदीसाठी नगरकरांनी केलेली गर्दी पाहता आयुक्तांनी कडक निर्बंध काढले.

मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोलपंप, गॅस वितरण, बँका, डेअरी, पशुखाद्य आणि कृषी सेवा केंद्रांना सवलत देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत शहरातील डेअरी, पशुखाद्य आणि कृषी सेवा केंद्र सुरू असणार आहेत. मात्र या ठिकाणी काम करणार्‍या मालकापासून कर्मचार्‍यांपर्यंत सगळ्यांनाच कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे. कोरोना टेस्ट झाल्यानंतर तसे प्रमाणपत्र जवळ बाळगावे.

महापालिकेचे पथक चेकिंगसाठी आल्यानंतर त्यांनी मागणी केल्यास हे प्रमाणपत्र दाखविण्यात यावे असे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. या आदेशाचा भंग केल्यास पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टीजेन टेस्ट करून घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com