अहमदनगर जिल्हा परिषद गट आरक्षणात त्रुटी?

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव 2007 नंतर पुन्हा अनुसूचित जातीसाठी राखीव
जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

अहमदनगर (प्रतिनिधी)

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या गटांसाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात त्रुटी राहिल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव गट 2007 मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याचे दर्शवित निवडणूक घेण्यात आली होती. यंदा देखील हा गट अनुसूचित जातीसाठी राखीव दर्शविण्यात आला आहे. 2022 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या झेडपी गटाच्या आरक्षणात त्रुटी झाल्याने ही चूक झाली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सन 2007 मध्ये आढळगाव गटाचे आरक्षण नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला राखीव असतांना चुकीने त्यावेळी त्याठिकाणी अनूसुचित जाती प्रवर्गातून अनिल ठवाळ हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले होते. त्यानंतर 2012 आणि 2017 च्या निवडणूक आरक्षण काढताना ही चूक लक्षात आलेली नव्हती.

मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सोडतीनंतर त्याठिकाणी पुन्हा अनूसुचित जातीसाठी आरक्षण निघाल्याने 2007 मधील चूक आता लक्षात आली आहे. यामुळे आढळगाव गटातील आरक्षण चुकले असल्याचे स्पष्ट होत असल्याने जिल्ह्यातील अन्य गटांचे आरक्षण फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याशी संपर्क केला असता, आढळगाव गटात काढण्यात आलेले आरक्षण हे लोकसंख्येनूसार काढण्यात आलेले आहे. सन 2007 साली राजपत्रात हा गट ओबीसी महिलांसाठी राखीव दाखविण्यात आलेला आहे. त्यानूसार एकदा काढलेले आरक्षण पुन्हा काढता येत नाही. दरम्यान,आढळगावच्या आरक्षणाबाबत शुक्रवारी एक हरकत दाखल झाली असून सर्व बाबी तपासून या प्रकरणात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com