शिर्डी विमानतळ सुविधांनी सज्ज - दीपक कपूर

शिर्डी विमानतळ सुविधांनी सज्ज - दीपक कपूर

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर शिर्डी विमानतळ आधुनिक व डिजिटल केले असून यात आता डिजिटल स्क्रीन डिस्प्ले,

सुरक्षेसाठी नवीनतम सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल स्पीकर्स, बॅगेज बेल्ट व डिजिटल स्क्रीन यासह आधुनिक सुविधा व उपकरणे यांचा समावेश असून यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानतळ प्राधिकरण व प्रवाशांचा मोठा फायदा होईल, अशी माहीती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली आहे.

शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर विद्युत व दूरसंचारचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अजय देसाई यांच्या टीमने सदर काम पूर्ण केले आहे. प्रवाशांना व विमानतळ प्राधिकरण यांना या सेवांचा लाभ घेता येईल, अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.

याठिकाणी अत्याधुनिक सुविधा व्हाव्यात यासाठी आ. आशुतोष काळे यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे मागणी केली होती तसेच पाठपुरावाही सुरू होता. शिर्डी विमानतळवरून मागील महिन्यात 25 तारखेला मालवाहतूकही सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी विमानांची संख्या वाढत आहे. या विमानतळास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाईट लँडींगही येत्या दीड महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न विमानतळ विकास प्राधिकरणाचा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com