श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

इपीएस 95 पेन्शन धारकांचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून त्यासाठी अनेक आंदोलने केल्यानंतर कामगार मंत्रालयाने पेन्शनवाढीसाठी अवलोकन करून अहवाल

सादर करण्याच्या सूचना पार्लमेंटरी standing comittee ने दिल्या होत्या. त्या खासदारांच्या समितीने नुकताच अहवाल सादर करून इपीएस 95 पेन्शनधारकांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल अधिवेशनात सादर केल्यावर केंद्र सरकार त्यावर मंजुरी दिल्यावर ही पेन्शनवाढ देशातील 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार असल्याची माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी दिली.

सध्या 1 हजार रुपयाचे आसपास दरमहा पेन्शन मिळत आहे.या अल्पशा पेन्शनमध्ये काहीही गरजा पूर्ण होत नाहीत. खा. भार्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांची समिती नेमण्यात आली होती.पेन्शनर्स, विविध संघटना यांनी 9 हजार रुपये दरमहा पेन्शनवाढ मिळावी, अशी मागणी केली होती.

2013 मध्ये खा. भगतसिंह कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीने 3 हजार रुपये पेन्शन दरमहा वाढ करावी, अशी शिफारस केली होती. परंतु केंद्र सरकारने फक्त 1 हजार रुपये दरमहा पेन्शनला मंजुरी दिली. ती आज अखेर मिळत आहे. त्याचप्रमाणे अनेक या संदर्भातील सुमारे 60 याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दि. 23 मार्च 2021 पासून दररोज होणार आहे, असे श्री. पोखरकर यांनी सांगितले.