एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागणार

मंत्री थोरात यांची उद्योग मंत्री देसाई यांच्या समवेत चर्चा
एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागणार

अहमदनगर (प्रतिनिधी)-

नगर एमआयडीसीतील उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उद्योजकांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा यांच्यासह एमआयडीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये उद्योजकांच्या अनेक मागण्या सकारात्मकपणे मार्गी लावण्याचे आदेश उद्योगमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनलची उभारणी करून या ठिकाणी ट्रक चालकांसाठीच्या पार्किंग व्यवस्थेसह सुविधा केंद्र उभे करणे, सुलभ शौचालय, स्नानगृह, भोजनालय उभे करणे यासह आराखडा सादर करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक याठिकाणी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी बसतात.

नगरमधील उद्योजकांना विविध कामांसाठी सातत्याने नाशिकला खेटा घालाव्या लागतात. उद्योजकांचा हा त्रास दूर व्हावा यासाठी नगर एमआयडीसीतील एरिया मॅनेजर यांना अधिक अधिकार देत उद्योजकांना नाशिकला जावे लागणार नाही. या संदर्भात देखील कार्यवाही तातडीने करण्याची सूचना देण्यात आली आहे. दोन भिन्न यंत्रणांकडून कर संकलित करण्याऐवजी एकाच यंत्रणेकडून कर संकलित करून तो एमआयडीसीची प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये योग्यपणे वाटप करण्या संदर्भामध्ये आवश्यक ती पावले तातडीने उचलण्याच्या बाबतीमध्ये सूचना करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com